काही दिवसांच्या कालखंडानंतर आज, एक एप्रिल रोजी मुंबई, पुण्यासह राज्यात बहुतेक सर्व ठिकाणी वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण सुरू झाल्याने वाचकांनी आनंद व्यक्त केला आहे. वृत्तपत्रांमुळे करोना विषाणूचा संसर्ग होत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटना व सर्व वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केल्याने वृत्तपत्र वाचनाचा आनंद सर्व वाचकांना पूर्वीसारखाच लुटता येणार आहे. वृत्तपत्र विक्रेता संघटनेने यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे.
वृत्तपत्रे घरी आल्याने वाचक आनंदित