श्रीरामाची स्तुती करणारे रामरक्षा स्तोत्र

श्री रामरक्षा स्तोत्र हे रामाची स्तुती करणारे स्तोत्र आहे. श्रीरामांचे संरक्षण मिळावे, यासाठी हे स्तोत्र प्रार्थना म्हणून म्हटले जाते. रामरक्षा स्तोत्र हे बुधकौशिक ऋषिंनी रचलेले आहे. रामनवमी, धार्मिक उत्सव, विशेषतः नवरात्रौत्सवात रामरक्षेचे सार्वजनिक पठण केले जाते. रामरक्षा स्तोत्र हे अतिशय प्रभावी असे स्तोत्र आहे. रामरक्षेचे दररोज पठण केल्यास मनाला शांती मिळते, जीवन निरोगी आणि समृद्ध-संपन्न होते, असे मानले जाते. आजच्या घडीला संपूर्ण जग एका कठीण परिस्थितीतून जात आहे. करोना नावाचे संकट देशावरही घोंगावत आहे. यातून भीतीचे आणि नकारात्मकतेचे वातावरण निर्माण होत आहे. भारतीय संस्कृतीत उपासनेचे सामर्थ महत्त्वाचे मानले गेले आहे. घरीच बसल्या बसल्या नामस्मरण करून मनाची शक्ती आपण वाढवू शकतो. आज चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच श्रीराम नवमी आहे. मनाला शांती देणाऱ्या, सकारात्मक वातावरण तयार करणाऱ्या आणि संरक्षण करणाऱ्या या स्तोत्राचे पठण दररोज करावे, असे म्हटले जाते. रामनवमीनिमित्ताने रामरक्षा स्तोत्र...